Department of Marathi – मराठी विभाग

श्री सिद्धीविनायक महिला महाविद्यालयातील मरठीविभागाची स्थापना १९९३ मध्ये झाली. मराठी विभागाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉशैलेश त्रिभुवन आहेत. तसेच डॉ. रवींद्र शिंदे हे एम.ए. मराठीचे समन्वयक आहेत. मराठी विभागात प्रथम वर्ष कला, द्वितीय वर्ष कला, तृतीय वर्ष कला, प्रथम वर्ष वाणिज्य (मराठी व इंग्रजी माध्यम) तसेच एम.ए. (प्रथम वद्वितीय वर्ष) यावर्गांना अध्यापन केले जाते. विभागाला अनेक प्रसिद्ध मान्यवरांनी भेट दिलेली आहे. ‘समाजसुधारकांचे मराठी साहित्याला योगदान’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र आयोजित केले होते. मराठी विभागात विविध स्वरूपाचे कार्यक्रम घेतले जातात. संगणक कार्यप्रणाली व मराठी भाषा कार्यशाळा. लघुपट निर्मिती कार्यशाळा अशा कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा गौराव दिन, कविता वाचन, व्याख्याने इत्यादी कार्यक्रमहोत असतात.

B.A.

FYBA G-1 मराठी विनोदी कथा व व्यावहारिक व उपयोजित मराठी
http://www.unipune.ac.in/university_files/Syllabi_revised2013.htm
SYBA G-2 आधुनिक मराठी साहित्य आणि उपयोजित मराठी
http://www.unipune.ac.in/university_files/Syllabi_revised2014.htm
TYBAG-3 आधुनिक मराठी साहित्य आणि व्यावहारिक व उपयोजित मराठी
http://www.unipune.ac.in/university_files/Syllabi-revised2015.htm

F.Y.B.Com.

FYBCom Gen ‘यशोगाथा’ पाठ्यपुस्तक आणि व्यावहारिक मरठी
http://www.unipune.ac.in/university_files/Syllabi_revised2013.htm

M.A.

Paper-5 प्रसारमाध्यमे आणि साहित्यव्यवहार भाग-१ व २
Paper-6 साहित्य: समीक्षा आणि संशोधन
Paper-7 विशेष लेखकाचा अभ्यास (मध्ययुगीन / अर्वाचीन)
Paper-8 मराठीतील वैचारिक साहित्य (ऐच्छिक विषय) व साहित्याचा सामाजिक दृष्टीने अभ्यास
  http://www.unipune.ac.in/university_files/Syllabi_revised2014.htm

UG

Course Class Strength
BA FYBA 157
BA SYBA 78
BA TYBA 66
BCOM FYBCOM-A  (Marathi Medium) 132
BCOM FYBCOM-B  (English Medium) 130
BCOM FYBCOM-C  (English Medium) 130

PG

Course Class Strength
MA MA 06
Sr. No. Photo Name Designation Qualification Experience
1 ShaileshTribhuvan Prof. Dr. Shailesh Tribhuwan Associate Professor MA, NET MPhil, PhD. 26 years
2 RavindraShinde Dr. Ravindra Shinde Assistant Professor MA, B.Ed., NET, Ph.D. 10 years

Prof. Dr. Shailesh Tribhuwan

 1. Guide for M.Phil. & Ph.D.
 2. Editor: Saksham Samiksha- Journal (सक्षम समीक्षा)
 3. Chairman: Sahityik Kalavant Pratishthan, Warje, Pune
 4. (कार्याध्यक्ष : साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान, वारजे, पुणे) 

 5. 19 books Published as Single Other with ISBN no
 6. 15 year Editor of ‘Palavi’ College Annual Periodical
 7. Paper Published and read (07,08 June 2016) in London
 8. Paper Published and read (13,14 June 2016) in Zurich, Switzerland
 9. Examination work in University : Paper Setter, Chairman Paper Checking
 10. Published Articles in News Papers & Media
 11. Invited Poet in Sahitya Sammelan
 12. 14 Research Articles Published in Peer review Journals
 13. 06 chapter Published in book.
 14. 3 paper presented in International Conference
 15. 22 paper presented in National Seminars
 16. 10 paper presented in state Seminars
 17. 50 Seminars And Workshops Attended
 18. Published Articles in News Papers & Media

Dr. Ravindra Shinde

 1. 6 Articles Published in Peer Review Journal
 2. 8 Articles Published in Book Chapter
 3. 13 Paper Published In Seminar / Workshop
 4. 3 Seminar Organized
 5. Participated in 3 International Level Seminar
 6. Participated in 8 National Level Seminar
 7. Participated in 11 State Level Seminar

पालवी’ प्रकाशन

महाविद्यालयाचा वार्षिकांक ‘पालवी’चे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाने केले होते. या कार्यक्रमासाठी मा. निकिता भगवत, संस्कार भारती कोकण प्रांत कला संकलन प्रमुख व शिक्षण, कला व सामाजिक कार्यकर्ती, ठाणे. यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. एन. डी. पाटील (कार्योपाध्यक्ष, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि अध्यक्ष- महाविद्यालय  विकास समिती, श्रीसिद्धीविनायक महिला महाविद्यालय, कर्वेनगर पुणे) यांनी भूषविले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉ. वंदना कुलकर्णी यांनी केले.  कार्यक्रमाचे आयोजन पालवी निर्मिती मंडळ व मराठी विभाग यांनी केले.

भित्तीपत्रक

भित्तीपत्रकाचे प्रकाशनमा. गिरीश प्रभुणे (प्रसिद्ध लेखक, संपादक व विचारवंत) यांच्या हस्ते आणिमा. एन. डी. पाटील (कार्योपाध्यक्ष, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि अध्यक्ष- महाविद्यालय  विकास समिती, श्रीसिद्धीविनायक महिला महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले होते.भित्तीपत्रकाचे आयोजन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन व डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले.

वाड्मय मंडळ उद्घाटन

महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन मा. गिरीश प्रभुणे (प्रसिद्ध लेखक, संपादक व विचारवंत) यांच्या हस्ते करण्यात आले. पारधी या त्यांच्या स्वलिखित आत्मकथनावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. एन. डी. पाटील (कार्योपाध्यक्ष, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि अध्यक्ष- महाविद्यालय  विकास समिती, श्रीसिद्धीविनायक महिला महाविद्यालय, कर्वेनगर पुणे) यांनी भूषविले.

पेन इंटरनॅशनल (Pen International Congress)

पेन इंटरनॅशनल (Pen International Congress) जगभरातील लेखकांची एक जागतिक स्तरावरील संघटना आहे. ही संघटना १९२१ मध्ये लंडन येथे स्थापन झाली. त्यांचा उद्देश जगभरातील लेखकांमध्ये मैत्री आणि बौद्धिक सहकार्य वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. पेन आंतरराष्ट्रीय संघटनेचे जगामधील 100 पेक्षा अधिक देशांमध्ये स्वायत्त केंद्र आहेत. पेन आंतरराष्ट्रीय अध्यक्ष जॉन रल्स्टन सोल आहेत. २०१८-१९ या वर्षात पुणे शहरात मराठी भाषेच्या नेतृत्वाखाली पेन इंटरनॅशनलचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जगातील लेखकांनी मराठी भाषेचे महत्व आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेतले. आपले महाविद्याल आणि संस्थेला पाच देशांमधील लेखकांनी भेट दिली.

१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन

माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जी. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन’ या निमित्तडॉ. धनंजय कुलकर्णी, अधिसभा सदस्य, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, कर्वे रोड, पुणे. यांचे व्याख्यान आयोजित केले होते. (विषय: ग. दि. माडगुळकर) या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान मा. अनिल माणकीकर (सदस्य- महाविद्यालय विकास समिती श्री सिद्धीविनायक महिला महाविद्यालय) यांनी भूषविले. सदर कार्यक्रमाचे आयोजन वाड्मय मंडळ, पालवी निर्मिती मंडळ व मराठी विभाग यांनी आयोजित केले होते.